आपल्या ब्राउजरमध्ये जावास्क्रिप्ट कसे सक्रीय करावे

ही वेळ अत्यंत उत्साही आहे, कारण गेल्या काही वर्षांमध्ये जावास्क्रिप्ट ही मर्यादित ज्ञानापासून अत्याधुनिक वेब डेव्हलपमेंट कौशल्यामध्ये वापर करण्यापर्यंत विकसित झाली आहे. आजच्या काळात जावास्क्रिप्ट हे इतक्या प्रमाणात अपरिहार्य झाले आहे की, फक्त जावास्क्रिप्ट चालविण्यासाठी बऱ्याच इंटरनेट ब्राउजरमध्ये समर्पित सर्च इंजिन आहे.

जावास्क्रिप्ट हे वेबवर वापरले जाणारे अप्रतिम तंत्रज्ञान आहे, आणि आपल्या वेब ब्राउजर साठी या तंत्रज्ञानाला निष्क्रियकरण्याचा सल्ला कधीही देता येणार नाही. सर्वात जास्त लोकप्रिय वेबसाईटस या जावा वर आधारित आहेत, याचाच अर्थ ते त्यांची माहिती सादर करतांना सहभागी वैशिष्टे (इंटरअॅक्टीव्ह फिचर) चालविण्यासाठी जे वापरकर्त्याला आनंददायी अनुभव देणाऱ्या जावास्क्रिप्ट चा वापर करतात.

जावास्क्रिप्ट निष्क्रिय (डीसएबल) केल्याने, आपल्या ब्राउजर मध्ये काही वैशिष्टे (इंटरअॅक्टीव्ह फिचर) जसे जाहिरात दाखविणे, अॅनिमेशन किंवा ऑडीओ यासारख्या बाबी दिसणार नाहीत किंवा चालू शकणार नाही. तथापि, ही अत्यंत चांगली बाब आहे की जावास्क्रिप्ट सक्रीय (अॅक्टीवेट) करण्यासाठी अगदीच सोपी आहे. याव्यतिरिक्त, संपूर्णपणे जावास्क्रिप्ट निष्क्रिय न करता काही वेबसाईटसाठी आपण जावास्क्रिप्ट निष्क्रिय करू शकतो. 

म्हणूनच, जर आपण आपल्या ब्राउजर मध्ये जावास्क्रिप्ट निष्क्रिय (डीसएबल) केली असेल आणि आपल्याला जर आता ती परत सक्रीय (एनेबल) करायची असेल तर आम्ही आपल्याला मदत करू शकतो. आम्ही हे मार्गदर्शक आपल्याला सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या ५ इंटरनेट ब्राउजर वर जावास्क्रिप्ट सक्रीय (एनेबल) करण्यासाठी लिहीले आहे. यासोबत, आम्ही आपल्याला जावास्क्रिप्ट काय आहे त्याची माहिती देऊ आणि जावास्क्रिप्ट मुळे आपण काय करू शकतो ह्याची माहिती देऊ.

आपल्या वेब ब्राउजर वर जावास्क्रिप्ट सक्रीय आहे. जे आपण जावास्क्रिप्ट निष्क्रिय केले तर, हे वाक्य बदलेल.

वेब डेव्हलपर्स साठी सूचना

ज्या वापरकर्त्याने आपल्या वेब ब्राउजर मध्ये स्क्रिप्ट डीसएबल केले आहे त्या ६ लोकप्रिय सामाईक ब्राउजर्स मध्ये जावास्क्रिप्ट सक्रीय करण्यासाठी आपल्याला या साईटबरोबर लिंकिंग करावे लागेल. आपल्या गरजेप्रमाणे आपण खालील दिलेला कोड बदल करून वापरण्यासाठी आपल्याला परवानगी आहे.

<noscript>
 या साईटच्या संपूर्ण कार्यक्षमतेसाठी जावास्क्रिप्ट सक्रीय करणे आवश्यक आहे.
<a href="https://www.enablejavascript.io/"> येथे आपल्याला जावास्क्रिप्ट सक्रीय कसे करावे, यासाठी वेबब्राउजर मध्ये सूचना दिसतील</a>.
</noscript>

स्क्रिप्ट निष्क्रिय झालेल्या वापरकर्त्याचा अनुभव परिणामकारक व्हावा यासाठी आम्ही enablejavascript.io या साईटला निर्माण केले आहे:

 • आपल्या ब्राउजरसाठीच्या सूचना आम्ही पेजच्या वरच्या भागात दर्शविले आहे.
 • सर्व इमेज आम्ही सुसंगतपणे, मोठ्या संपूर्ण आकारात आणि सहजरित्या समजतील अशा दर्शविल्या आहेत.

आम्हाला वाटते की आपल्या व्हिजिटर्स ने जास्तीतजास्त जावास्क्रिप्ट सक्रीय करावे!

गुगल क्रोम गुगल क्रोम

 1. आपल्या ब्राउजर मध्ये गुगल क्रोम उघडा.
 2. आपल्या स्क्रीनच्या उजव्या बाजूला वर असलेल्या मेनू आयकॉन (तीन डॉटस) वर क्लिक करा.
 3. ड्रॉप-डाऊन मेनू मध्ये “ सेटिंग्ज” निवडा - खालून तिसरा पर्याय
 4. आता डाव्या बाजूच्या साईड बार मेनू वरील “ प्रायव्हसी आणि सेक्युरिटी” वर क्लिक करा.
 5. “प्रायव्हसी आणि सेक्युरिटी” मध्ये “साईट सेटिंग्ज” निवडा.
 6. साईट सेटिंग्ज अंतर्गत जोपर्यंत “जावास्क्रिप्ट” सापडत नाही नाही तोपर्यंत स्क्रोल करत राहा आणि क्लिक करा.
 7. “अलोवड (रेकमंडेड)ला स्वीच करा - ज्यावेळी ते सक्रिय होईल त्यावेळी ते निळे होईल.

अभिनंदन, आपण आताच आपल्या गूगल क्रोम ब्राउजर वर जावास्क्रिप्ट सक्रीय केले आहे.

इंटरनेट एक्स्प्लोरर इंटरनेट एक्स्प्लोरर

 1. आपले इंटरनेट एक्स्प्लोरर ब्राउजर लॉंच करा आणि एक विंडो उघडा.
 2. “टूल्स” वर क्लिक करा – नेहमी मेनूबार च्या वर स्थित असतो. त्यानंतर, लिस्टमध्ये दर्शविलेल्या पर्यायापैकी “इंटरनेट ऑप्शन्स” हा पर्याय निवडा. हा पर्याय जलद गतीने सापडण्यासाठी “अल्ट की” चा वापर करावा.
 3. “सेक्युरिटी टॅब” वर क्लिक करा.
 4. “कस्टम लेव्हल’ बटन वर क्लिक करा.
 5. जोपर्यंत “स्क्रिप्टींग हेड” सापडत नाही नाही तोपर्यंत स्क्रोल डाऊन करत राहा.
 6. जावास्क्रिप्ट चालू करण्यासाठी “अॅक्टीव्ह स्क्रिप्टींग” हा पर्याय निवडा.
 7. “ओके” वर क्लिक करा.
 8. आपल्या ब्राउजर ला रिफ्रेश करा.

मायक्रोसॉफ्ट एज मायक्रोसॉफ्ट एज

 1. आपला मायक्रोसॉफ्ट ब्राउजर उघडा
 2. आपल्या स्क्रीनच्या उजव्या बाजूला वर तीन डॉटस असलेल्या मेनू आयकॉनवर क्लिक करा
 3. ड्रॉप-डाऊन मेनू टॅबमध्ये “ सेटिंग्ज” निवडा
 4. डाव्या बाजूच्या सेटिंग्ज पेन मध्ये जाऊन “साईट परमिशन्स” वर क्लिक करा.
 5. “जावास्क्रिप्ट” पर्याय निवडा.
 6. अलोवड (रेकमंडेड)” ला चालू करा.

मोझीला फायरफॉक्स मोझीला फायरफॉक्स

 1. आपला मोझीला फायरफॉक्स ब्राउजर लॉंच करा आणि एक विंडो उघडा.
 2. अॅड्रेस बार वर “about:config” टाईप करा आणि एंटर की प्रेस करा.
 3. प्रिफरन्सेस सर्च बॉक्स शोधण्यासाठी वार्निंग मेसेज च्या खाली “अॅक्सेप्ट द रिस्क अँड कंटिन्यू” बटन वर क्लिक करा.
 4. आता प्रिफरन्सेस सर्च बॉक्समध्ये “javascript.enabled” एंटर करा.
 5. सर्च रिझल्ट मध्ये “javascript.enabled” हा पर्याय लोकेट करा आणि जावास्क्रिप्ट निवडा.
 6. आपल्या ब्राउजर ला रिफ्रेश करा.

ऑपेरा ऑपेरा

 1. आपला ऑपेरा मिनी ब्राउजर लॉंच करा
 2. “इझी सेटअप” मेनू उघडा.
 3. इझी सेटअप मेनूच्या खालपर्यंत स्क्रोल डाऊन करा आणि “गो टू ब्राउजर सेटिंग्ज” पर्याय निवडा.
 4. नंतर, “साईट सेटिंग्ज” पर्याय मिळेपर्यंत स्क्रोल डाऊन करा आणि क्लिक करा.
 5. “साईट सेटिंग्ज” अंतर्गत, जावास्क्रिप्ट दर्शविणारा पर्याय लोकेट करा आणि निवडा.
 6. “अलोवड (रेकमंडेड)ला स्वीच करा - ज्यावेळी ते सक्रिय होईल त्यावेळी ते निळे होईल.
 7. अभिनंदन, आताच आपण जावास्क्रिप्ट सक्रीय केले आहे.

अॅपल सफारी अॅपल सफारी

 1. आपल्या डिव्हाईस च्या “टूल्स” सेक्शन मध्ये नेव्हीगेट करा.
 2. “प्रिफरन्सेस” पर्याय निवडा.
 3. सेक्युरिटी आयकॉन वर टॅप करा.
 4. “एनेबल जावास्क्रिप्ट” चेकबॉक्स वर क्लिक करा.
 5. आपला ब्राउजर रिस्टार्ट करा.

जावास्क्रिप्ट विषयी

जावास्क्रिप्ट काय आहे?

जावास्क्रिप्ट ही “क्लायंट-साईड” स्क्रिप्टींग लँग्वेज असून ती प्राथमिकपणे वेबपेजसाठी सर्व प्रकारच्या डायनामिक संवादाला निर्माण करणे आणि जोडण्यासाठी वापरली जाते. तंत्रज्ञानाच्या जगात जलदगतीने विकसित झाल्याने जावास्क्रिप्ट ‘आधुनिक वेब डेव्हलपमेंट’ क्षेत्रात मैलाचा दगड ठरली आहे.

जावास्क्रिप्ट परंपरागत सॉफ्टवेअर डिझाईन लँग्वेजबरोबर उत्तमपणे कार्य करते आणि त्यामुळेच हे वेगळे वैशिष्ट इतर लँग्वेजपासून जावास्क्रिप्ट ला भिन्न आणि उत्तम बनवतं. जेथे सीएसएस आणि एचटीएमएल लँग्वेज वेबपेज ला स्टाईल प्रदान करतात, तेथे जावास्क्रिप्ट वेबपेजेसला इंटरअॅक्टीव्ह एलेमेंट (परस्परसंवादी घटक) प्रदान करतात जे वापरकर्त्याच्या अनुभवाला समृद्ध करतात.

याचाच अर्थ, आपल्या ब्राउजिंग सेशन मध्ये आपल्या डिव्हाईस वर कोणतेही बदल होतात किंवा कोणतीही गोष्ट पॉप अप होते, होय! ती जावास्क्रिप्ट असते.

आजच्या काळात, जावास्क्रिप्ट इतकी परिणामकारक आणि सर्वोत्तम आहे की आधुनिक काळातील ब्राउजर जसे गुगल क्रोम, सफारी, मोझीला फायरफॉक्स, ऑपेरा, इंटरनेट एक्स्प्लोरर, मायक्रोसॉफ्ट एज सुद्धा जावास्क्रिप्ट वापरतात. अँड्रॉइड आणि आय-फोन सारख्या लोकप्रिय मोबाईल डिव्हाईससुद्धा जावास्क्रिप्ट आधारित ब्राउजर्स आणि नेटिव्ह अॅप्लीकेशन्स चालविण्यासाठी सक्षम आहेत.

जेव्हा आपल्याला जावास्क्रिप्टचे महत्त्व कळते त्यावेळी आपल्याला जावास्क्रिप्टला समजणे खूप सोपे होते, तर चला, याविषयी अधिक माहिती घेऊ.

जावास्क्रिप्ट चा इतिहास

निर्विवादपणे, गेल्या २५ वर्षांपासून, वेब डेव्हलपमेंट साठी एका नेहमी वापरल्या जाणाऱ्या कोड ची निर्मिती करण्यात आली. इंटरनेटच्या सुरुवातीने जावास्क्रिप्टची जागा घेण्यास सुरु झाले याचा अंदाज नव्हता. पण सुरुवातीपासूनच, जावास्क्रिप्टने आपले स्थान नुसतेच एक शक्तिशाली प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणून प्रस्थापित केले नाही तर आधुनिक वेब डेव्हलपमेंटच्या युगात आपले नवीन स्थान प्रस्थापित केले.

स्कीम कडून प्रेरणा घेऊन, नेटस्केप कम्युनिकेशन्स येथे काम करत असतांना बेर्नार्ड इच यांनी १९९५ मध्ये, जावा आणि सेल्फ, जावास्क्रिप्टचा विकास केला. १९९० मध्ये नेटस्केप कम्युनिकेशन्स त्यांच्या ब्राउजर-द नेटस्केप नेव्हीगेटर- मुळे इंटरनेट वर आपले अस्तित्त्व चांगलेच राखून होते जो मोजाइक ब्राउजर या मुख्य प्रवाहातील मेनस्ट्रीम ब्राउजर सोबत मोठ्या प्रमाणात वापरला जात होता. 

मार्क अँडरसन नेटस्केप कम्युनिकेशन्सचे सह-संस्थापक होते, ज्यांनी १९९३ मध्ये मोजाइक ब्राउजर प्रोजेक्ट वर काम करणाऱ्या इल्लीनॉइस युनिव्हर्सिटी च्या विकसक टीमसोबत ज्यांनी काम केले होते. जशी वेब ब्राउजर ने लोकप्रियता मिळविली, आणि टेक कंपन्यांनी इंटरनेटवरील सर्वात कार्यक्षम ब्राउझर विकसित करण्याचा प्रयत्न केला.

मायक्रोसॉफ्ट ने या नवीन बदलाला ओळखले आई त्यांनी नेटस्केप बरोबर तुल्यबळ स्पर्धा करण्यासाठी त्यांनी इंटरनेट एक्स्प्लोरर प्रोजेक्टची स्थापना केली. त्यामुळे ब्राउजर च्या मार्केटमध्ये जास्तीचा भाग मिळविण्यासाठी नेटस्केप आणि मायक्रोसॉफ्ट यांचे ब्राउजर युद्ध पेटले.

यावेळी, वेब डेव्हलपर्स नी वेब पेजेसला डायनामिक वैशिष्टे निर्माण आणि प्रदान करण्यासाठी स्क्रिप्टींग लँग्वेज तयार करण्यासाठी प्रयत्न वाढविले. आरंभीच्या काळात त्यांनी जावा वर आपले लक्ष केंद्रित केले पण नंतर त्यांना असे लक्षात आले की वापरकर्त्यांना चांगला अनुभव देण्यासाठी अजून लवचिकता हवी आहे.

नेटस्केप ने जाणले आणि त्यांनी सहजसोप्या स्क्रिप्टींग लँग्वेजची संकल्पना आखली ज्यात डेव्हलपर्स वेब पेजेससाठी डायनामिक वैशिष्टे निर्माण आणि प्रदान करू शकतात. हा काळ अत्यंत महत्त्वाचा होता, आणि याच वेळी जावास्क्रिप्ट चे जनक प्रकाशझोतात आले.

१९९५ मध्ये, नेटस्केप नेव्हीगेटर २.० ब्राउजरकरिता एक डायनामिक लँग्वेज बनविणे आणि कार्यरत करण्यासाठी नेटस्केपने बेर्नार्ड इच यांना करारबद्ध केले. श्री. इच यांच्यासाठी हा प्रोजेक्ट अत्यंत तातडीचा बनला होता. तथापि, त्यांना ज्या गोष्टीमध्ये विशेष रुची होती अश्या प्रोजेक्ट मध्ये काम करण्यासाठी उत्सुक असल्याने त्यांनी टीम नेटस्केप बरोबर काम केले. आणि त्यातूनच सहजसोप्या स्क्रिप्टींग लँग्वेजची संकल्पना जन्माला आली. सुरुवातीला श्री. इच यांनी त्याचे नाव मोचा ठेवले पण नंतर त्यांनी ते नाव बदलून “लाइव्ह स्क्रिप्ट” असे केले. अगदी कमी वेळात म्हणजे फक्त १० दिवसांत, श्री. इच यांनी लँग्वेजचे कार्यकारी प्रोटोटाईप बनविले आणि ते नेटस्केप नेव्हिगेटर २.० बीटाची अंमलबजावणी करण्यास सज्ज झाले.

ब्राउजर च्या मार्केटमध्ये प्रभुत्त्व गाजविण्यासाठी, नेटस्केप ने सन मायक्रोसिस्टिम्स- जावा प्रोग्रामिंग लँग्वेजचे डेव्हलपर, यांच्याशी भागीदारी केली. या भागीदारीमुळे सन मायक्रोसिस्टिम्स ने वेब डिलिव्हरी प्लॅटफॉर्म वर जावा कम्युनिटी ला जावा उपलब्ध करून देण्यासाठी नेटस्केप नेव्हीगेटरला आपल्याकडे सुरक्षित केले. 

१९९६ मध्ये, म्हणजे एका वर्षानंतर, लाइव्ह स्क्रिप्ट चे जावा कम्युनिटी मध्ये स्वीकाराहर्ता वाढण्यासाठी मार्केटिंग धोरणानुसार जावास्क्रिप्ट असे नामकरण करण्यात आले. जावास्क्रिप्ट ही क्लायंटच्या नेटस्केप नेव्हिगेटर २.० ब्राउजर मधील छोट्या प्रोजेक्टसाठी स्क्रिप्टींग लँग्वेज बनली, आणि त्याचबरोबर जावा ही वेब सोल्युशन साठी एक प्रभावी विशेष टूल (साधन) म्हणून ओळखली जाऊ लागली. 

त्यापाठोपाठ, मायक्रोसॉफ्ट ने जावास्क्रिप्टवर उलट तपासणी (रिव्हर्स इंजिनीअरिंग) करत त्यांच्या इंटरनेट एक्स्प्लोरर-३ साठी एक कस्टम व्हर्जन म्हणजे सुधारित जावास्क्रिप्ट विकसित केले. आणि सन मायक्रोसिस्टिम्स ज्यांच्याकडे जावा ब्रँडची मालकी होती आणि जे नेटस्केप ने प्रमाणित (लायसन्स) केले होते, त्यांचे सोबत कायदेशीर समस्या टाळण्यासाठी त्याला जेस्क्रिप्ट असे नाव देण्यात आले, 

सुटसुटीत, लवचिक आणि नॉन-डेव्हलपर्स ला लगेच उपलब्ध असणारी जावास्क्रिप्ट (जेस्क्रिप्ट) हे मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली, त्यामुळे वेब पेजेस अधिक परस्परसंवादी (इंटरअॅक्टीव्ह) आणि अत्यंत डायनामिक झाले.

दुर्दैवाने, समजण्यासाठी कमी अवघड असल्याने दोन्ही कंपन्यांना नकारात्मकता सहन करावी लागली, कारण लोकांना ज्ञान असेल किंवा कमी ज्ञान असेल तरीही न समजता कोड स्निपेटस लिहिता येत होते. याखेरीज, जावास्क्रिप्ट लोकांसाठी चांगला अनुभव न येता (पॉप अप अॅडस, ब्राउजर स्निफिंग इत्यादीमुळे) निराशाजनक झाली होती.

या समस्येला सोडविण्यासाठी इसीएमए प्रमाणीकरण (स्टँडर्डायजेशन) केले गेले. नेटस्केप आणि सन मायक्रोसिस्टिम्स यांनी जावास्क्रिप्ट ला प्रमाणित करण्यासाठी इसीएमए इंटरनॅशनल, जे स्टँडर्डसाठी अभियुक्त होते. प्रमाणीकरण (स्टँडर्डायजेशन) या लँग्वेजसाठी एक महत्त्वपूर्ण पायरी आणि एक चांगली बाब होती.

यामुळे जावास्क्रिप्ट एका मोठ्या वापरकर्त्या समुदायासाठी उपलब्ध झाली आणि सर्व डेव्हलपर्ससाठी स्क्रिप्टींग लँग्वेजचा सर्वोत्तम विकास ठरली. प्रमाणीकरणामुळे (स्टँडर्डायजेशन) नकरात्मक तपासणी करणाऱ्या लोकांना लक्षात ठेवले गेले. सन च्या जावा ट्रेडमार्क चे उल्लंघन टाळण्यासाठी, इसीएमए कमिटी ने स्टँडर्डाइज लँग्वेजचे इसीएमएस्क्रिप्ट असे नामकरण केले. 

त्यामुळे गोंधळ अजून जास्त वाढला, पण इसीएमएस्क्रिप्ट ही प्रमाणित स्पेसिफिकेशन चा संदर्भ घेत असल्याने, जावास्क्रिप्ट (आजसुद्धा) ही स्क्रिप्टींग लँग्वेज म्हणून ओळखली जाते.

जावास्क्रिप्ट कशासाठी वापरली जाते?

प्रचलित झाल्यापासून ते आतापर्यंत जावास्क्रिप्ट चा वापर हा वर्षागणिक बदलला आहे. आताच्या घडीला, आपण विचार करत असाल की फक्त १० दिवसात विकसित करण्यात आलेल्या स्क्रिप्टींग लँग्वेजने इंटरनेटमध्ये अमुलाग बदल कसे केले. ते कसे आपण पाहू:

डायनामिक वेब पेजेस

जावास्क्रिप्ट हे वेबपेजला डायनामिक इंटरअॅक्शन (परस्परसंवादी) जसे ट्रांझीशन एलेमेंटस आणि फंक्शन जोडतात. ज्यामुळे वापरकर्त्याला नियमितपणे रिफ्रेश न करता नवीन इमेजेस आणि ऑबजेक्टस लोड करणे शक्य होते.

वेब आणि मोबाईल अॅप डेव्हलपमेंट

जावास्क्रिप्टची एक सर्वात शक्तिशाली बाब म्हणजे त्यामध्ये विस्तारित स्वरुपात लायब्ररी आणि फ्रेमवर्क्स आहेत जे वेब आणि मोबाईल अॅप विकसित करण्यासाठी क्रॉस-प्लॅटफॉर्म तयार वापरले जातात.

गेम डेव्हलपमेंट

वेब आधारित गेम विकसित करण्यासाठी जावास्क्रिप्ट सक्षम आहे. त्यामध्ये हॉस्ट लायब्ररी आणि फ्रेमवर्क्स असतात जे २-डी आणि ३-डी गेम बनविण्यासाठी लोकांना उपयुक्त ठरतात. a

सर्व्हर स्तरावरील समस्या निराकरण (सोल्युशन्स)

वेबसाईट आणि मोबाईल अॅप डेव्हलपमेंटच्या पुढे, वेब डेव्हलपर्स एका सक्षम वेब सर्व्हर बांधणी आणि Node.js वापरून बॅक-एंड विकास साधता येतो.

जावास्क्रिप्ट सक्रीय करण्याचे फायदे

आपल्या ब्राउजर मध्ये जावास्क्रिप्ट सक्रिय (एनेबल)करणे हे जावा मुळे होणाऱ्या तोट्यांच्या तुलनेत अत्यंत फायदेशीर आहे, आणि हे फायदे जावाच्या महत्त्वाच्या ठिकाणी वापर आणि इंटरनेट वर वर्षानुवर्षे होणारा वापर यामुळे समजतात. ज्यावेळी आपण जावास्क्रिप्ट सक्रिय करतात त्यावेळी आपल्याला पुढीलप्रमाणे फायदे होतात:

अधिक चांगल्या इंटरअॅक्टीव्ह वेबसाईटस

अधिक चांगल्या इंटरअॅक्टीव्ह वेबसाईट आणि इंटर फेस जसे अॅनिमेशन, व्हिडिओ, अॅड बॅनर्स आणि इतर सर्वसमावेशक वेब अनुभवासाठी वैशिष्ट्यांची उपलब्धता.

वेग वाढणे

जावास्क्रिप्ट ही क्लायंट-साईड स्क्रिप्ट आहे,जी सर्व्हर रिक्वेस्ट कमी करून वापरकर्त्याची वेबपेज सोबत इंटरअॅक्टीव्हीटी (परस्परसंवाद) गती वाढवते.

सर्व्हरवरील लोड कमी करणे

जसे जावास्क्रिप्ट ही क्लायंट-साईड स्क्रिप्ट म्हणून काम करते, त्यामुळे सर्व्हरला जोडण्याचा (कनेक्ट) होण्याचा कालावधी कमी केला जातो, परिणामी बँड विडथ आणि लोड कमी होतात 

जावास्क्रिप्ट च्या मर्यादा

वेब पेजेस आणि वापरकर्त्यांची इंटरअॅक्टीव्हीटी (परस्परसंवाद) जावास्क्रिप्टच्या अनेक फायदेशीर बा बींमुळे साध्य होते, पण काही छोटी कामे जावास्क्रिप्ट करू शकत नाही. आपण जावास्क्रिप्टच्या काही मर्यादा पाहू:

 1. जावास्क्रिप्टची सर्वात मोठी मर्यादा म्हणजे अंमलबजावणीबाबत तीला एकल पालक बॉडी (सिंगल पॅरेंट बॉडी) नसते.
 2. जावास्क्रिप्ट आपल्या पेज सोर्स आणि इमेजचे संरक्षण करत नाही. याचाच अर्थ आपल्या वेब पेजवरील इमेजेस वापरकर्त्याच्या डिव्हाईस वर सहजरित्या डाऊनलोड करता येतात.
 3. जावास्क्रिप्टला कोणतीही मल्ट प्रोसेसर क्षमता नाही. त्यामुळे, त्याचे मेमरी वर कोणतेही नियंत्रण नसते.
 4. शेवटी, जरी वापरकर्ता वेगवेगळ्या डोमेनवरील वेब पेजेस एकाच वेळी पाहू शकत असेल तरीही जावास्क्रिप्ट वेगवेगळ्या डोमेनवर होस्ट केलेले वेब पेजेस हाताळू शकत नाही, एका डोमेन पेज वर चालत असलेल्या जावास्क्रिप्टला इतर डोमेन पेज ची माहिती मिळू शकत नाही.

जावास्क्रिप्ट ला निष्क्रिय (डीसएबल) कसे करावे

जास्तीतजास्त प्रमाणात आपल्या ब्राउजर वर जावास्क्रिप्ट सक्रीय केले तर भरपूर प्रमाणावर फायदे होतात, आपापल्या सुरक्षिततेचा विचार केला असता तात्पुरत्या स्वरुपात आपण तिला निष्क्रिय करू शकतो. जावा आधुनिक काळातील ब्राउजर जसे गुगल क्रोम, सफारी, मोझीला फायरफॉक्स, ऑपेरा, इंटरनेट एक्स्प्लोरर, मायक्रोसॉफ्ट एज आणि इतर यासारख्या ब्राउजर मधून निष्क्रिय करता येतात. 

जर आपण आपल्या वेब ब्राउजर मध्ये जावास्क्रिप्ट निष्क्रिय केले तर, त्याचा अर्थ असा आहे की आपण काही दिवसांपूर्वी जावास्क्रिप्ट निष्क्रिय केली होती किंवा आपल्या ब्राउजर मध्ये डीफॉल्ट पद्धतीने जावास्क्रिप्ट आपल्या ब्राउजरमध्ये स्थापित केलेली नाही, जर सक्रिय केले तर, आपल्या पसंतीच्या वेब ब्राउजर असलेल्या डिव्हाईस वर जावास्क्रिप्ट कसे निष्क्रिय करता येईल ते पाहू.

गुगल क्रोम गुगल क्रोम

 1. आपल्या ब्राउजर मध्ये गुगल क्रोम उघडा.
 2. आपल्या स्क्रीनच्या या उजव्या बाजूला वर असलेल्या मेनू आयकॉन (तीन डॉटस) वर क्लिक करा.
 3. “सेटिंग्ज” ला क्लिक करा.
 4. आता डाव्या बाजूच्या साईड बार मेनू वरील “ प्रायव्हसी आणि सेक्युरिटी” वर क्लिक करा.
 5. “प्रायव्हसी आणि सेक्युरिटी” मध्ये “साईट सेटिंग्ज” निवडा.
 6. “जावास्क्रिप्ट” सेक्शन शोधा आणि डीसएबल पर्याय निवडा.
 7. ‘डन’ वर क्लिक करा आणि आपला क्रोम ब्राउजर रिस्टार्ट करा.

इंटरनेट एक्स्प्लोरर इंटरनेट एक्स्प्लोरर

 1. आपल्या डिव्हाईस वर इंटरनेट एक्स्प्लोरर उघडा.
 2. “टूल्स” वर क्लिक करा – नेहमी मेनूबारच्या उजवीकडे वर स्थित असतो.
 3. ड्रॉप डाऊन मेनू मधून “इंटरनेट ऑप्शन्स” ह्या पर्यायावर क्लिक करा.
 4. नंतर, “सेक्युरिटी टॅब” वर क्लिक करा.
 5. “सेक्युरिटी” कॉलम वर, अजून एक पेज उघडण्यासाठी कस्टम लेव्हल” बटन वर क्लिक करा.
 6. जोपर्यंत “अॅक्टीव्ह स्क्रिप्टींग” सापडत नाही नाही तोपर्यंत स्क्रोल डाऊन करत राहा. डीसएबल वर क्लिक करा.
 7. आपला ब्राउजर रिस्टार्ट करा.

मोझीला फायरफॉक्स मोझीला फायरफॉक्स

 1. fअॅड्रेस बार वर “about:config” टाईप करा आणि एंटर की प्रेस करा.
 2. आपल्या स्क्रीनवर पॉप-अप झालेली रिस्क कॉशन (वार्निंग सूचना) चा स्वीकार करा.
 3. सर्च बार मध्ये “javascript.enabled” हा पर्याय टाईप करा आणि रिझल्टींग पर्याय पहा.
 4. जर आपण सक्सेस रेकॉर्ड केले, तर आपण आपल्या फायरफॉक्स ब्राउजर वरून जावास्क्रिप्ट यशस्वीरीत्या निष्क्रिय केले आहे.
 5. If you record success, then you have successfully disabled JavaScript on your Firefox browser.